दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे मोफत लाठी काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर येथे आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 02, 2022 08:29 AM
views 316  views

सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत आयोजित मोफत लाठी काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरूर येथे करण्यात आला. 

        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू असलेल्या प्राचीन मर्दानी युद्धकलेविषयी आवड निर्माण करणे, विरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, चापल्य व कौशल्य वाढविणे. स्वसंरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे आदी उद्दिष्टे समोर ठेवून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाने इच्छुक शाळा, हायस्कूल, कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. 

    या शिबिरातून मार्गदर्शक किशोर सरनोबत यांनी हायस्कूलच्या निवडक विद्यार्थ्यांना लाठी काठीचे प्रशिक्षण दिले.

     या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष शमनोहर दळवी, अरुण म्हाडगुत, चंद्रसिंग वारंग, मुख्याध्यापक शंकर कोराणे, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, संस्था सचिव समीर नाईक, श्री.लोहार सर, दिलीप शेवळकर, दयानंद आंबावले, रोहन राऊळ, संकेत सावंत, स्वप्निल पालकर व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे नेरुर हायस्कूलच्या संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

हे शिबीर आपल्या परिसरातील शाळा, हायस्कूल व कॉलेजमध्ये आयोजित करण्यासाठी ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दुर्ग मावळा परिवारातर्फे करण्यात आले आहे.