
दोडामार्ग : 40 वर्षांची परंपरा राखत दोडामार्ग येथील डंपर चालक मालक संघटना दोडामार्ग पिंपळेश्वर चौक येथील प्रसिद्ध असलेल्या श्री पिंपळेश्वर चरणी श्रावण महिन्यात श्री सत्यनारायण महापूजा घालून सर्व डंपर दोडामार्ग चौकात उभे करून त्या वाहनांची ब्राम्हणाच्या हस्ते पूजा करून आगळा वेगळा उत्सव साजरा करतात.
श्रावण महिना सुरु झाला की दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या तीर्थ क्षेत्रात अनेक भाविक देवाचे दर्शन घेतात. तालुक्यातील कसईनाथ, तसेच तेरवण मेढे व दोडामार्ग चौकात असलेल्या श्री देव पिंपळेश्वर देवाच्या चरणी लीन हाऊन पूजा अर्चा करतात. हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री पिंपळेश्वर देवस्थान चरणी तालुक्यातील सर्व वाहन चालक दुचाकी, रिक्षा, चारचाकी, डंपर चालक मालक हे सर्व जण प्रत्येक दिवशी श्री सत्यनाराण पूजा घालून आपल्या वाहनांची पूजा करून आपला व्यवसाय चांगला चालावा यासाठी गाऱ्हाणं करतात.
गेली 40 वर्षे दोडामार्ग तालुक्यात ही परंपरा केली जात आहे. यावर्षी याला 40 वर्षे झाली. मंगळवारी तालुक्यातील सर्व डंपर चालक मालक यांनी प्रथम पूजा घालून आपली परंपरा कायम राखली आहे. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर दुपारी तीर्थ प्रसाद, महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला.