
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील दुकानवाड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे उपवडे, वसोली, साकिर्डे, आंजीवडे, आणि शिवापूर या गावांची एसटी बस सेवा तसेंच चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
वाहतूक ठप्प झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शिवापूर,आंजीवडे, जाण्यासाठी सुमारे 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
चारचाकी वाहतूक थांबली असली तरी दुचाकीस्वारांसाठी लोखंडी पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दुचाकीस्वार या पर्यायी पुलाचा वापर करून वाहतूक करत आहेत. मात्र, यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा त्रास होत आहे.