
सावंतवाडी : येथील एका कंपनीकडून स्थानिक युवक - युवतींचे तब्बल ३ महिन्यांचे वेतन अदा केले गेले नव्हते. त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत दीपक केसरकर यांचे लक्ष वेधलं होतं. दरम्यान, दीपक केसरकर यांनी या अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर त्यांनी या युवक युवतींना ते वेतन मिळवून दिले आहे. यासाठी अन्यायग्रस्तांकडून केसरकर यांचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.