मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील इथली वाहतूक ठप्प

Edited by: भरत केसरकर
Published on: July 18, 2023 19:47 PM
views 136  views

कुडाळ : माणगाव खोराला पावसाने झोडपले आहे. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड भागात सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुकानवाड भागातील दुकानवाड, वसोली, वीरवाडी, शिवापूर, चाळोबा येथील पुलं पाण्याखाली गेल्याने वसोली आंजिवडे शिवापूर वाहतूक ठप्प आहे.

सकाळी पावसाने जोर धरल्याने सखल असलेले दुकानवाड पुल पहिलेच पाण्याखाली गेले आहे. तर बहुचर्चित आंबेरी पुलावर देखील पाणी आल्याने आंबेरी जुने पुलावर पाण्यखाली गेले आहे. पण नविन पुलावरून वाहतूक हलवल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी होणारी माणगाव खोऱ्यातील २७ गावाची वाहतूक पहिल्यांदाच ठप्प होण्यापासून थांबली आहे. माणगाव खोऱ्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडत आहे. या भागाला पावसाने झोडपून काढले आहे