दारू पिऊन वाहने चालवणं पडेल महागात !

Edited by: ब्युरो
Published on: May 31, 2024 07:18 AM
views 774  views

सावंतवाडी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे मार्फत 30 व 31 मे 2024 रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का या बाबत तपासणी करण्यात आली.

ही तपासणी ओरोस, कासार्डे, ओसरगाव टोल नाका येथे करण्यात आली. यावेळी एकूण 55 हुन अधिक वाहनचालकांची तपासणी केली. याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विनोद भोपाळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील, अमित पाटील  व वाहन चालक एस व्ही स्वामी उपस्थित होते.