ड्रायव्हर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 04, 2024 19:53 PM
views 326  views

देवगड : हिट अँड रन हा कायदा रद्द करा अन्यथा स्टेरिंग छोडो आंदोलन करण्याचा पवित्र घेणार असे आशयाचे निवेदन देवगड तहसीलदार यांना ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व ड्रायव्हर भाऊ महिला कुटुंब आधार सामाजिक संस्था या संस्थांद्वारे देण्यात आले.

हिट अँड रन अचानक झालेल्या अपघाताला जबाबदार  असलेल्या ड्रायव्हरला दहा वर्षाची कारावासाची सजा असा कायदा फलित केला. हा कायदा आम्हा वाहन चालक बांधवांना मंजूर नाही. कारण आम्ही जाणून-बुजून केलेला तो अपराध नाही. वाहन चालक बांधव देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या कायद्यामुळे वाहन चालक व बांधवांचे परिवार उध्वस्त होतील आणि देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळेल परिणामी वरील सर्व कारणे लक्षात घेता हा कायदा रद्द करण्यात यावा. यासाठी ड्रायव्हर भाऊ महिला कुटुंब आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे सर्व सभासदांतर्फे  जामसंडे बाजारपेठ ते देवगड या ठिकाणी निषेध आंदोलन रॅली  काढून जिल्हाधिकारी कार्यालय व  तहसीलदार कार्यालय येथे काळा कायदा रद्द करा असे निवेदन सुपूर्द करण्यात आले . जर हा काळा कायदा रद्द करण्यात आला नाही तर आम्ही सर्व ड्रायव्हर बांधव स्टेरिंग छोडो आंदोलन करण्याचा पवित्र घेणार  आहोत. अशा आशयाचे निवेदन देवगड तहसीलदार विशाल खत्री यांना देण्यात आले.

यावेळी ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेचे तसेच ड्रायव्हर भाऊ महिला कुटुंब आधार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अक्षय धुरी, अमित कदम, विकास राऊत, आनंद वाडेकर, अजिंक्य लाड सचिन आयरे, अरविंद हळदणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.