
कणकवली : कणकवली शहर बाजारपेठ सह मारुती आळी परिसरात मोकाट जनावरांचा त्रास वाहनचालक पादचारी आणि व्यापाऱ्यांना होत आहे. 2 वर्षांपूर्वी कणकवली शहर मोकाट जनावर मुक्त करण्याची पोकळ घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली. सत्ताधारी केवळ घोषणांचे गाजर दाखवत आहेत. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालत मोकाट जनावरांपासून मुक्ती द्यावी. अन्यथा नगरपंचायत समोर मोकाट जनावरे सोडू असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी दिला आहे.