वाहनचालकांनो फसवणूक होतेय, इथे करा तक्रार

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 22, 2024 12:46 PM
views 568  views

रत्नागिरी :  जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील कुशल वाहनचालक पुरविण्याबाबत 11 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यास शासनमान्यता देण्यात आली आहे.  या करारानुसार बाडेन-वुटेनबर्ग राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी परिवहन विभागामार्फत तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तरी याबाबत वाहनचालकांची कोणी आर्थिक व इतर बाबतीत फसवणूक करत असेल तर वाहनचालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे लेखी तक्रार करावी, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.