३२ प्रवाशांचे जीव वाचविलेल्या चालक सचिन खुडेंचा सन्मान

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2025 13:00 PM
views 678  views

सावंतवाडी : कुडाळहून पणजीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटीचा ब्रेक अचानक निकामी झाल्यानं अपघात घडला होता. चालक सचिन खुडे यांनी प्रसंगावधान दाखवत बस डोंगराच्या दिशेने वळवत दरडीवर चढवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मृत्यू समोर दिसताना चालकाने तब्बल ३२ प्रवाशांचे जीव वाचविले. यासाठी चालकाचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

कुडाळ पणजी ही एसटी बस इन्सुली घाटातून खाली जात असताना गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने बस चालक सचिन खुडे यांच्या लक्षात आले. गाडीचा ताबा राखता येत नसल्याने तसेच एका बाजूला खोल दरी असल्याने चालकाने समय सूचकता राखून एसटी बस दरडीच्या बाजूने वळवली. त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. मृत्यूच्या दारातून चालक, वाहक व प्रवासी सुखरूप परतले. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने चालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे, हेलन निब्रे आदी उपस्थित होते.