
सावंतवाडी : आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही रेखाकला परीक्षेत यशाची परंपरा कायम राखलीय. एलीमेंटरी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागलाय. तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 93.10 टक्के लागलाय.
एलीमेंटरी परीक्षेसाठी 18 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागलाय. यात युवराज गावडे, नैतिक घोगळे, सदाशिव मोरजकर, अपूर्वा परब, अश्मी पिंगुळकर यांनी 'ए' श्रेणी प्राप्त केलीय. निधी भट, प्राजक्ता दाभोलकर, विशाल हळदणकर, हर्षा कवडेकर, आर्या नाईक, गंगाराम नाईक, पांडुरंग नाईक, दर्शना परब, लवू परब, अक्षता झोरे, गणेश झोरे यांनी 'बी' श्रेणी प्राप्त केली. उर्वरित विद्यार्थ्यांनी 'सी' श्रेणी प्राप्त केलीय.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला 29 विद्यार्थी बसले होते. यापैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 93.10 टक्के लागलाय. प्राची पडते, प्राची सावंत यांना 'ए' श्रेणी प्राप्त केली. मयुरी आरोसकर, चैतन्य च्यारी, आर्यन हरिजन, बाबली नाईक, हर्षदा नाईक, श्रेया नाईक, स्नेहल नाईक, सृष्टी नाईक, उत्कर्षा नाईक, रितिका पालयेकर, जान्हवी शिरोडकर यांनी 'बी' श्रेणी प्राप्त केलीय.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक विवेकानंद सावंत यांचं मार्गदर्शन लाभलं. संस्था अध्यक्ष निलेश परब, संस्था सदस्य, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सरिता नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर तसेच, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं.