
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे मुळस येथील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजतां श्री राम सीता पंचायतन देवतांची पूजा व अभिषेक, ९ ते ११ राम नाम जप यज्ञ, ११ ते दुपारी ०१ प्रभू श्री राम महा मंत्राचा जप, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ४ महाप्रसाद, संध्याकाळी ८ ते १० रामभक्तांचे सुश्राव्य भजन तर रात्रौ ठीक १० वाजतां दुर्वांकुर प्रोडक्शन दोडामार्ग निर्मित प्रा. वसंत कानेटकर लिखित व युवा नाट्यकार गणेश ठाकूर दिग्दर्शीत महान नाट्यकृती "रायगडाला जेव्हा जाग येते"हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री राम सीता पंचायत देवतांचे दर्शन घ्यावे तसेच आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हेवाळे ग्रामस्थ तसेच श्री सातेरी मायदेव युवा मंडळ हेवाळे यांनी केले आहे.