डॉ यशवंत गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून बढती

Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2025 12:38 PM
views 14  views

सावंतवाडी : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले या ठिकाणी बढती मिळाली आहे.

डॉ. यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक, (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बढती बदली झाली आहे त्यांचे  पदवी पर्यंत शिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, दापोली तर पदव्युत्तर शिक्षण कृषि विद्यापिठ, धारवाड व पी.एच.डी पर्यंतच शिक्षण महात्मा फुले कृषि विद्यापिठ, राहुरी येथे झाले आहे ते नीटची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास होऊन सहाय्यक प्राध्यापक म्हणुन कृषि महाविद्यालय, दापोली येथे रूजू झाले होतेबी.एस.स्सी. ॲग्री, बी.एस.स्सी. हॉर्टी तसेच बी.एस.स्सी. फॉरेस्ट्री या पदवी अभ्यासक्रमांमध्ये मागील १२ वर्ष वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन त्यांनी केले.

इन्ट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी, प्लान्ट पॅथोलॉजी, ॲग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी बायोफर्टीलायझर व बायोकंट्रोल एजन्ट, फॉरेस्ट प्लान्ट पॅथोलॉजी या पदवी विषयांचे अध्ययन त्यांनी केले तसेच प्लॉन्ट वायरोलॉजी, बॅक्टरीओलॉजी व फुड मायक्रोबायोलॉजी या पदव्युत्तर विषयांचे अध्ययन केले.हिस्सार हरियाणा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 'एक्सलेन्स टीचींग अवॉर्ड' ने त्यांना गौरवण्यात आले.

ते पाच वर्ष तण संशोधन प्रकल्पामध्ये काम केले तसेच मागील तीन वर्षांपासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे 'अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प' मध्ये कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. आतापर्यंत तीसपेक्षा जास्त संशोधन पेपर विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशीत केले.त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नी सीमा गोवेकर उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.