
सावंतवाडी : शनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल चे विभाग प्रमुख संदेश नारायण सोमनाचे यांना कुवेंपू विद्यापीठ शिमोगा कर्नाटकची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी प्रा. के. वसंतकुमार पै यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला शोधप्रबंध सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली. यांच्या पीएचडी पदवी चा महाविद्यालयातील संशोधन कार्यास मोलाचे योगदान लाभणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेमार्फत प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील आणि प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.