डॉ. सायली कामतचं MDS मध्ये विशेष प्राविण्य..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 05, 2023 15:11 PM
views 294  views

कणकवली : येथील  डॉ. सायली महेश कामत हिने दंत वैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केले. डॉ. सायली कामत यांनी बीडीएस ही पदवी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय मध्ये मिळवली. त्यानंतर तिने उच्च शिक्षण संगमनेर येथील कॉलेज एस. एन.बीटी मधून पूर्ण केले.

दंत वैद्यकीय क्षेत्रात एन्डोडॉनटीस या विषयातील तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. रुट कॅनल स्पेशालिस्ट म्हणूनही तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. डॉ. सायली ही कणकवलीतील प्रतीथयश व्यापारी महेश कामत व  रुपाली कामत यांची मुलगी तर रमेश कामत, सुरेश कामत व कै. अपिशेठ गावाणकर यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.