
सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी इंडिया आणि भारत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. इंडिया @75 असताना 70% भारत अजूनही गावात आहे हेही पाहिले पाहिजे. चॅट जिपीटी पासून केअरफूल रहायला पाहिजे. त्यामुळे आपण मशीनवर अवलंबून राहणार, आपल्या मेंदूची क्रियाच बंद होईल. तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता यात दरी पडता कामा नये. गुगलमध्ये दंग असणाऱ्या लहान मुलांबराबर गावात रहाणाऱ्या मुलांचाही विचार व्हायला पाहिजे कारण इंडिया आणि भारत एकमेकांजवळ आहेत असं मत अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं.