
सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचा सल्ला दिला. वाचनाशिवाय पर्याय नसल्याच त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त वाचावं अस आवाहनही यावेळी मुलांना केलं. याप्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सल्लागार जयु भाटकर, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे आदी उपस्थित आहेत.