का गहिवरले डॉ. माशेलकर ?

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 20, 2023 11:15 AM
views 114  views

सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत अनवाणी चालावं लागलं अशी आपली परिस्थिती होती. मात्र, अशा परिस्थितीत आपल्या आईने जिद्द सोडली नाही. महत्त्वाचे म्हणजे तिने आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही असेही त्यांनी सांगितले. आईच्या आठवणीने यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर भावुक झालेले पहायला मिळाले. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, माध्यम सल्लागार जयु भाटकर,  ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे आदी उपस्थित आहेत.