
सावंतवाडी: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल बघता महाराष्ट्रात होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल काय लागणार हे आत्ताच सांगणं सहज सोप्पं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आले असे निवडणूक आयोगाने जाहीर करावे असं मत उबाठा शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, बिहार मध्ये ७ कोटी ४२ लाख अधिकृत मतदार असताना निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील माहिती नुसार ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर या दोन चरणांमध्ये एकूण ७ कोटी ४५ लाख मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. हे आश्चर्यकारक आहे. एकूण मतदारांपेक्षा तीन लाख मतदान जास्त झाल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार जर महाराष्ट्रात होणार असेल तर निवडणूका घेण्याचा फार्स कशाला? निदान निवडणूक प्रक्रियेचा कोट्यवधी रुपयांचा जनतेचा खर्च तरी वाचेल अस मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.










