वेंगुर्ल्यातील डाॅ. मयूर मणचेकरांनी संपादन केली अस्थिरोगतज्ञ पदवी

Edited by: दिपेश परब
Published on: April 05, 2025 19:00 PM
views 49  views

वेंगुर्ले : उभादांडा-वेंगुर्ला येथील रहिवासी डाॅ. मयूर प्रल्हाद मणचेकर याने एमयूएचएस विद्यापीठाची एमएस (अस्थिरोगतज्ञ) ही मान्यताप्राप्त पदव्युत्तर परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर पदवी (post graduation) संपादन केली आहे. 

डॉ.मयूर यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळा उभादांडा येथे व महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पार पडले. 

प्रथितयश जी. एस. मेडिकल कॉलेज व केइएम हाॅस्पिटलमधे त्यानी मेरीटवर प्रवेश मिळवून तेथे एमबीबीएस पदवी प्राप्त केली. अस्थिरोगतज्ञाचे पदव्युतर शिक्षण त्यानी नाशिक येथुन पूर्ण केलं. 

डॉ. मयूर हे वेंगुर्ल्याचे बालरोगतज्ञ डाॅ प्रल्हाद मणचेकर यांचे कनिष्ठ पुत्र होय. एमएस नंतर प्रॅक्टीससाठी सिंधुदुर्गात येण्यापूर्वी अनुभवासाठी आणखी १ वर्ष नाशिक मध्येच काढायचा त्यांचा मानस आहे.