कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्रियांका म्हसकर यांची नियुक्ती

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2024 11:26 AM
views 479  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका मोहन म्हसकर यांना महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ या पदावर "कंत्राटी वैद्यकिय अधिकारी" म्हणून  नियुक्ती देण्यात आली आहे.

या नियुक्तीचे पत्र जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे. डॉ. प्रियांका  म्हसकर यांनी  पदभार स्वीकारला असून रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांनी दिली.