जानकीबाई सुतिकागृहात डॉ. दुर्भाटकर यांची OPD

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 19:53 PM
views 248  views

सावंतवाडी : भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालय राणी जानकीबाई सुतिकागृह सन १९२९ पासून जिल्ह्यातील स्त्री रुग्णांची सेवा करीत आहे. या रुग्णालयात जिल्ह्याचे प्रसिदध स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर मानद चिकित्सक म्हणून आपली सेवा देणार आहेत. जिल्ह्याच्या कानाकोप-यातूनच नव्हे तर नजीकच्या गोवा राज्यातून रुग्ण डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या चिकित्सेकरीता सावंतवाडी पर्यंत येत होते. या रुग्णांची सेवा घडावी या उद्देशाने राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, विश्वस्त डॉ. मिलींद खानोलकर यांचे सह समस्त संचालक मंडाळाच्या आग्रहास्तव डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सार्वजनिक सुट्टी वगळता दररोज सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यंत आपली सेवा भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयच्या बाह्यरुग्ण विभागात देणार आहेत.

गरजू रुग्णांची प्रसुती व इतर आवश्यक शस्त्रक्रिया देखील ते या रुग्णालयात करणार असून ते आपली सेवा गुरुवार दि. १३ जुलै २०२३ पासून देणार आहेत. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ रूग्णांनी घ्यावा असं आवाहन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलं आहे.