
वेंगुर्ला : प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर २६ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या कुडाळ, कणकवली, देवगड, मालवण सावंतवाडी व वेंगुर्ला सर्व शाखांमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या १५ पिवळ्या रेशन कार्ड असलेल्या रुग्णांचे मोफत व इतर रुग्णांचे माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातील. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नेत्रपटल शस्त्रक्रिया (डोळ्याचा मागचा पडदा) व इंजेक्शन, तिरळेपणावरची व अश्रू पिशवीची शस्त्रक्रिया डॉ. गद्रे रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत केले जातील. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८६०५७४२५७२ यांच्याशी संपर्क साधावा.