
सावंतवाडी : राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णपयोगी वस्तू हॉस्पिटलला भेट देण्यात आल्या.
गेली २२ वर्षे डॉ. दुर्भाटकर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत चांगल्या प्रकारे रुग्णसेवा बजावत आहेत. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या या रुग्ण सेवेत त्यांनी तीस हजारहून अधिक महिलांच्या प्रसुती यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.
त्यांच्या ह्या कार्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. म्हणून या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसकर, विजय पवार, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, संजय साळगावकर, अरुण घाडी, रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.