डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वेंगुर्ला भाजपाच्यावतीने अभिवादन

Edited by: दिपेश परब
Published on: December 06, 2023 18:04 PM
views 70  views

वेंगुर्ला : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . भाजपाच्या वतीने २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत डाॅ . भिमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त " संविधान गौरव पंधरवडा " आयोजित करून आदरांजली वाहण्यात आली .

       यावेळी मार्गदर्शन करताना लखमराजे भोसले म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जातीभेद , लिंगभेद आणि वर्गभेद या विरुद्ध लढा देणारे समाज क्रांतिकारक आणि वंचितांच्या कल्याणाचा वसा घेतलेले राजकारणी म्हणून जगभर लौकिक आहे . त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलु पैकी एक महत्वाचा पैलु म्हणजे , ते एक निष्णात अर्थतज्ञ होते. 

       यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाल्या , मोदी सरकारने संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी करुन बाबासाहेबां बद्दल असलेला आदर द्विगुणित केला .

   यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, नगरसेविका श्रेया मयेकर, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे व निलेश मांजरेकर, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, युवा मोर्चाचे हेमंत गावडे, कृष्णाजी सावंत, मारुती दोडशानट्टी, तन्मय जोशी, महीला मोर्चाच्या कार्तीकी पवार व स्वरा देसाई, जेष्ठ कार्यकर्ते मनोहर होडावडेकर गुरुजी , महेश धुरी , प्रशांत धुरी , सुनील मठकर , सुरेश धुरी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केले .