पंचायत समिती देवगड इथं महामानवास अभिवादन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 14, 2026 12:11 PM
views 45  views

देवगड : पंचायत समिती देवगड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पंचायत समिती  कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती देवगडचे अधिक्षक कुणाल मांजरेकर, विस्तार अधिकारी (कृषी) अभिजीत मदने, सन्मा .विस्तार अधिकारी (कृषी ) विलास कोलते तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी भारतीय घटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.