
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान सावंतवाडी शाखे मार्फत आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. संतोष तळवणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रमुख वक्ते प्रा.डॉ. रमाकांत गावडे गोगटे वाळके कॉलेज बांदा यांनी विचार व्यक्त केले. आर्थिक विषमता चिंताजंक असून आर्थिक विषमता देशाच्या विकासाला अडसर ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे त्यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर, जिल्हा सदस्य प्रा. डॉ रमाकांत गावडे, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, तालुका खजिनदार दर्शना राणे, तालुका सदस्य प्रणिता. शोभा सावंत सावंत, संगीता रेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार संचिता गावडे यांनी मानले.