कणकवलीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्यावतीने महामानवास अभिवादन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 06, 2023 16:21 PM
views 135  views

कणकवली : येथील अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कणकवली तालुका बौद्ध विकास संघ अध्यक्ष अंकुश कदम, कोषाध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष सुनील ताँबे, माजी अध्यक्ष जी. डी. कदम, वसंत कदम, मोहन तांबे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य दिलीप वर्णे, प्रांतीक सदयस्य विलास गावकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुका उपाध्यक्ष सत्यवीजय परब, खजिनदार राजू वरदम, तालुका सरचिटणीस किशोर गावकर, उदय सावंत, बाळू मेस्त्री आदि उपस्थित होते.