अतुल रावराणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 14, 2024 08:20 AM
views 259  views

वैभववाडी : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथील आंबेडकर स्मारकात जाऊन डॉ.बाबाबासाहेंबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेबांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे.या महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.आज सकाळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला श्री रावराणे यांनी पुष्पहार अर्पण केला.तसेच त्यांना अभिवादन केले.यावेळी शिवसेनेचे मंगेश लोके, रणजित तावडे,मनोज सावंत, शिवाजी राणे, सुनील रावराणे, बौद्ध सेवा संघाचे रविंद्र पवार यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित होते.