डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भिमशक्ती संघटनेकडून विविध कार्यक्रम...!

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2024 09:38 AM
views 52  views

सावंतवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सावंतवाडी भटवाडी येथे सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, सकाळी १०:३० वाजता समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

त्यानंतर भटवाडीत उपस्थित मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी विविध कार्यक्रम होणार आहे. भीमशक्ती संघटनेच्या सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यानी केले आहे.