प्राथमिक शिक्षणाधिकारी अडचणीत ; कारवाई होणार ?

निरंजन डावखरेंची कारवाईची मागणी !
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 16, 2024 07:52 AM
views 2619  views

सिंधुदुर्गनगरी  :  नियोजन समिती सभेत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत उपस्थित सर्व सदस्यांनी आवाज उठवला. जिल्ह्यातील शिक्षकांचे समुपदेशन, शिक्षण सेवक नियुक्ती याचबरोबर  शिक्षकांविणा असलेल्या शाळा. तसेच शाळा दुरुस्ती आदींची कामे या सर्वांवरच चर्चा झाली. मात्र या सर्वांमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर हेच कारभारामध्ये भोंगळपणा करत असल्याचे समोर आले. यामुळे अखेर निरंजन डावखरे यांनी यांच्यावर कारवाईची मागणी सभागृहात केली. याला सर्व उपस्थितांनी मान्यता दर्शविली त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर हे अडचणीत सापडले आहेत.या चर्चेत गोट्या सावंत,काका कुडाळकर,सावळाराम अणावकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 या बैठकीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ वैभव नाईक, आ निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नियोजन आयुक्त प्रमोद केभांवे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, नियोजन अधिकारी यशवंत बुधवळे यांसह सदस्य आणि अधिकारी उपस्थित आहेत.