
सिंधुदुर्गनगरी : निधी खर्च न केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी निलंबित झालाय. जिल्ह्यातील सर्व शाळा दुरुस्त करण्यासाठी पावणेदोन कोटी लागतील अस तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून तेवढे पैसे दिले. हा निधी खर्च झाला नाही. हा निधी कुणामुळे खर्च झालं नाही ते सांगा त्यावर कारवाई होणार. संध्याकाळ पर्यंत नाव सांगा त्यावर तात्काळ कारवाई होईल. अशांवर कारवाई होत नाही तोपर्यंत निधी असाच पडून राहणार. हे चालणार नाही. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.