
मालवण : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला दुहेरी यश प्राप्त झाले आहे. माध्यमिक गटात विद्यार्थी निर्मित फवारणी यंत्र या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील निखिल प्रकाश भावे या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून स्वकल्पनेने आदित्य कृष्णा घाडीगांवकर या आपल्या वर्ग मित्राच्या मदतीने हे उपकरण बनविले असून स्पर्धेत उत्कृष्ट पद्धतीने त्याची मांडणी करुन प्रभावीपणे परीक्षकांना व इतरांना माहिती दिली आणि त्याची उपयुक्तता समाजावून सांगितली.
तसेच शिक्षक निर्मित बल आणि गतीविषयक या विज्ञान शिक्षक व्ही. डी. काणेकर यांच्या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या उपकरणाची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे. गेली अनेक वर्षे काणेकर सर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश प्राप्त करत आहेत.
या यशाबद्दल निखिल भावे, आदित्य घाडीगांवकर आणि श्री. काणेकर सर यांचे संस्थाध्यक्ष बाबू बाणे, उपाध्यक्ष अच्युत भावे, सरचिटणीस तुषार राऊत, कार्याध्यक्ष शंकर घाडीगांवकर, सहसचिव विजय घाडीगांवकर, खजिनदार भाऊराव घाडीगांवकर, सर्व कार्यकारिणी सदस्य शालेय समिती अध्यक्ष श्री. उत्तम गांवकर, सदस्य श्री. दिपक चव्हाण, श्री. दशरथ घाडीगांवकर, संतोष गांवकर, मुख्याध्यापक वामन तर्फे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.