
दोडामार्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज आॅफ सायन्स प्रशालेच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. त्यामुळे या संघाची आता कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्था अध्यक्षा श्रीमती सिमा तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ. मिलिंद तोरसकर, सचिव श्रीमती कल्पना तोरसकर, समन्वय समिती सचिव *रश्मी तोरसकर, सह.सचिव *नंदुकुमार नाईक, प्रशासकिय अधिकारी मकरंद तोरसकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस.परब, जेष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई, पी.बी.किल्लेदार शालेय समिती सदस्य सतिश मोरजकर, उदय गवस, प्रकाश कुडासकर, रामदास मेस्री, मंगेश गवस, संजय धुरी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबाजी उर्फ दादा देसाई कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे. या विजेत्या संघाला प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.