युवराज्ञींच्या घरोघरी गाठीभेटी

Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2025 17:12 PM
views 75  views

सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतिक बांदेकर व सुकन्या टोपले यांचाही प्रचार केला. सालईवाडा भागात त्यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, मिसबा शेख, सुकन्या टोपले आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.