नम्रपणाचा आव आणून साईभक्त असल्याचा दिखावा नको

उपरकरांचा केसरकरांना टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2024 13:05 PM
views 140  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या तीन्ही निवडणूकांमध्ये ज्या-ज्या घोषणा केल्या त्यापैकी किती घोषणांची पुर्तता केली ? हे आमच्यासमोर येऊन सांगावं. नुसता नम्रपणाचा आव आणून आपण साई भक्त असल्याचा दिखावा करु नये असा टोला माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी लगावला.

विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेवून जिल्हयात घोषणांचा पाऊस पडत आहे.तसेच मोठया प्रमाणावर कामांची उद्घाटने केली जात आहेत.ही उद्घाटने जिल्हयाच्या विकासासाठी अथवा जनतेच्या भल्यासाठी नसून त्यातून मिळणा-या दक्षिणांसाठी आहेत.निवडणूकीत मोठया प्रमाणावर पैसे वाटता यावेत यासाठीच हा सर्व खाटाटोप सुरू आहे अशी टिका माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी केली.  यावेळी अशिष सुभेदार,मंदार नाईक आदी उपस्थित होते.