
सावंतवाडी : अनारोजीन लोबो ह्या शरीराने जरी शिंदे गटात असल्या तरी मनाने मात्र कुठे आहेत? हे शोधावं लागेल. कारण बरेच वेळ त्या आमच्याशी खाजगीरित्या बोलताना सांगतात माझं नाईलाज आहे. मी तुमच्या सोबतच आहे. असं सारखं बोलून दाखवल आहे. बबन राणे शिवसेनेत असताना त्यांना तालुकाप्रमुख व्हायचं होत. पण अड्ड्यावर बसणाऱ्यांना शिवसेनेत पद दिल जात नाही आणि तुम्ही जी महिन्यातून १० वेळा मुंबईवारी करता ती कशी, कोणाच्या पैश्याने ? सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यालयामध्ये सुद्धा पदाधिकारी जाऊन धुमाशान घातली जातात ती कशासाठी? थोडक्यात काय, कावीळ झालेल्या ना सगळं पिवळं दिसत.
रुपेश राऊळ हे शिवसेना पक्षासाठी रक्त सांडलेला शिवसैनिक आहे. लोकांची काम करतात लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात म्हणून ते आज समाजात पत ठेवून आहेत. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून मिळालेल पद घेवून उगाच कोणावर पण टीका करू नका असा टोला युवा सेना तालुका अधिकारी योगेश नाईक यांनी हाणला आहे.