LIVE UPDATES

शिरगाव हायस्कूलच्या नूतनीकरणासाठी साटम कुटुंबियांकडून देणगी

Edited by: मनोज पवार
Published on: June 18, 2025 12:22 PM
views 142  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल इमारतीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी साटम कुटुंबीयांकडून संस्थेकडे १,५०,००० रु देणगी सुपूर्त केली आहे..

शिरगाव हायस्कूल शिरगाव येथे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी १ लाख ५०हजार ची उदार देणगी कै.बलवंत साटम यांचे पणतू मिलिंद विठ्ठल साटम, शरद शांताराम साटम, दीपक काशीराम साटम, रघुनाथ मारुती साटम आणि राजेंद्र काशीराम साटम यांनी संस्थेकडे सुपूर्त केली.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, संस्था कार्यकारिणी सदस्य अमित साटम, शिरगाव शाळा समिती सदस्य मंगेश लोके, संतोष फाटक, कुवळे शाळा समितीचे सदस्य विनायक साटम, वसंत साटम, अंतर्गत हिशोब तपासनीस नागेश पवार, प्रमोद पालकर, सदानंद तावडे, आणि पालेकर गुरुजी उपस्थित होते.

“पणजोबांची आठवण, शिक्षणासाठी देणगी” – साटम कुटुंबीयांची शाळेसमोर कृतज्ञतेची यावेळी नतमस्तक झाले होते.हा कार्यक्रम शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न  झाला.७० वर्षांपूर्वी उभारलेली शाळेची इमारत – जिथं कै.बलवंत यसोजी साटम यांच्या स्मरणार्थ पहिली वर्गखोली उभी राहिली होती – त्या वास्तूत आज त्यांचे पणतू साटम कुटुंबीयांनी नव्या उजेडाची कास धरली.

कार्यक्रमात विजयकुमार कदम सर यांनी कै. बलवंत साटम यांच्या योगदानाची आठवण करून देताना  सांगितले, “सामान्य माणूस दगड-वीट रचतो, पण बलवंत साटम सरख्या व्यक्ती विचारांची शाळा उभी करतात.” रघुनाथ साटम यांनीही भावूक होत आपल्या पणजोबांच्या आठवणी शेअर केल्या.आजवर एका  महिन्यात  १० वर्ग खोल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी गोळा झालेला असून, ही देणगी त्या उपक्रमाला बळ देणारी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी देणगीदारांना संस्थेच्या वतीने आभारपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेच्या स्थापनेला ७० वर्षं पूर्ण होत असताना, इतिहास आणि वर्तमानाच्या साक्षीदार झालेला हा क्षण एक सामाजिक कृतज्ञतेचा सर्वोच्च आविष्कार ठरेल हे मात्र नक्की.