
सिंधुदुर्गनगरी : डॉन बाॅस्को हायस्कूल, ओरोस प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ चा निकाल १०० टक्के लागला आहे. गेली वर्षे 22 सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. एकूण १०८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. १) गुणानुक्रमे पहिला क्रमांक - कुमार अथर्व मिलिंद बोर्डवेकर एकूण गुण ९७.६० टक्के २) गुणानुक्रमे दुसरी - अनुष्का उमेश देसाई एकूण गुण ९७.०० टक्के गुणानुक्रमे दुसरा – स्मरण विनम्र तारी ९७.०० टक्के ३) गुणानुक्रमे तिसरा – ओमकार मधुकर परब ९५.६० टक्के. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सविओ गोम्स उप् मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव संस्थेचे मनेजर फादर पॉल डिसोझा तसेच फादर फ्रान्सीस झेविएर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.