मळेवाडमधील डॉग - कॅट शोचा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2025 12:05 PM
views 289  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मळेवाड येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर 1 च्या भव्य पटांगणावर सांस्कृतिक महोत्सव 2025 हे आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवातील ग्रुप डान्स त्याचप्रमाणे डॉग शो व कॅट शो चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी मळेवाड गावाच्या विकासामध्ये राजघराण्याचे नेहमीच योगदान राहिले आहे. तसेच याही पुढे राहील असे आश्वासन दिले. पर्यटन दृष्ट्या मळेवाड गाव हा खूप महत्त्वाचा असून मळेवाड गावाच्या विकासासाठी आम्हीही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

तसेच यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावागावात असे महोत्सव होणे गरजेचे असून ग्रामपंचायत आणि मंडळ जो उपक्रम करत आहे त्याचे कौतुक केले. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन आमदार सावंत यांना केले असता सावंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या सांस्कृतिक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तसेच गेली पाच ते सहा वर्षे आपण सातत्याने या महोत्सवाला येत असून या महोत्सवाची व्याप्ती वाढत असल्याचे मग व्यक्त केले. यामध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण न करता एकत्र येऊन सर्वजण हा महोत्सव साजरा करतात याचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, अमोल नाईक, स्नेहल मुळीक, कविता शेगडे, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक, मधुकर जाधव, गिरिजा मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,रोजगार सेवक अमित नाईक, उद्योजक राजा सावंत, माजगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी आदी उपस्थित होते.