
दोडामार्ग : अखेर नव्याने सुरु झालेल्या चंदगड दोडामार्ग- पणजी एसटी बस चे स्वागत मेढे येथे करून चालक व वाहक यांना उपसरपंच मायकल लोबो, सरपंच साक्षी देसाई, समीर देसाई यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले. व तालुका वासियां बरोबर सर्व प्रवाशांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
गेले कित्येक महिने दोडामार्ग सह घाट माथ्यावरील लोकांचे एसटी बस मुळे नाहक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. दोडामार्ग किंवा घाट माथ्यावर किंवा गोव्याला येजा करण्यासाठी प्रवाशांना त्रास सोसावा लागत होता. लोकांचे होणारे हाल पाहून तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो व हेवाळे उपसरपंच समीर देसाई व येथील ग्रामस्थांनी चंदगड दोडामार्ग पणजी नवीन एसटी बस सेवा सुरु करण्यात संदर्भात वारंवार चंदगड एसटी आगाराला पत्रव्यवहार पाठपुरावा करून एसटी बस सेवा सुरु करण्या संदर्भात मागणी केली.
अखेर सदरची एसटी बस सेवा मंगळवार पासून सुरु करण्यात आली. बुधवारी चंदगड येथून गोवा पणजी येथे जाणाऱ्या नवीन एसटी बस चे तेरवण मेढे येथे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी एसटी चालक व वाहक यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मेढे उवसरपंच मायकल लोबो,हेवाळे सरपंच साक्षी देसाई, उप सरपंच समीर देसाई, सत्यवान गवस,मनीषा गवस, प्रमोद गवस, नमिता गवस, निकिता कोरगावकर, गुलाबी केसरकर, सोनावल मुख्यध्यापक नंदकिशोर म्हापसेकर, सावंत आदी उपस्थित होते.