दोडामार्गला शिंदे - सेनेचा आनंदोत्सव

Edited by:
Published on: January 11, 2024 10:40 AM
views 452  views

दोडामार्ग : राज्यात लक्ष लागलेल्या एतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिंदे सेनेतील आमदार, खासदार, नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आनंद गगनात मावेनासे झालाय. त्याचीच प्रचिती गुरवारी तळकोकणात दोडामार्ग तालुक्यात आली. दोडामार्ग शिवसेना कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक  आमदार मंत्री यांचा जयजयकार करत विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. 

शिवसेना कोणाची व आमदार अपात्र निकालाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी  ऐतिहासिक निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. त्यांचे आमदार अपात्र होणार नसल्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा असलेला हा निर्णय होता. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन झाले, आणि या  संपूर्ण देशाचं लक्ष लागलं निकालाअंती शिवसेना ही ठाकरे गटाला धक्का देत खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यभर शिंदे समर्थक शिवसैनिक यांनी राज्यभर दिवाळी साजरी केली.

अशाच पद्धतीनं दोडामार्ग शिवसेना समर्थकांनी फटाके फोडून व घोषणा देत पेढे वाटून निकालाचा आनंद साजरा केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बेर्डे, जिल्हा समनव्यक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, रामदास मेस्त्री, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, मायकल लोबो, तिलकांचन गवस महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, उपजिल्हाप्रमुख मनीषा गवस, शहरप्रमुख शीतल हरमलकर, उपतालुकाप्रमुख सानवी गवस, सवीता नाईक, गुणवंती गावडे, युवती प्रमुख प्रांजल गवस, सगुरुदास सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.