
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग येथे ॐ नित्य दिव्य योगाश्रम बेतोडा फोंडा गोवा व श्री गुरुचरित्र सेवा केंद्र दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील विविध प्राथमिक, माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज मधील स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेसाठी ओम नित्य दिव्य योगाश्रम बेतोडा गोवा यांच्या साधकांनी परीक्षक म्हणून उत्तम प्रकारे कामगिरी पार पडली.
प्रत्येक गटामध्ये स्पर्धेत विजयी ठरलेल्या प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांना रोख रुपये एक हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रोख रुपये सातशे, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम रुपये 500 स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र याप्रमाणे पारितोषिके देण्यात आली तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
“योगा सशक्त राष्ट्रासाठी - आरोग्य हीच खरी संपत्ती” या ध्येयाने सूर्यनमस्काराचे महत्व समाजापर्यंत पोहोचवणे व युवकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच योगाभ्यासाची शिस्त, एकाग्रता व सातत्य रुजवणे या करीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
देवलाई किड्स स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब च्या मुलांनी योगासनांवर आधारित नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. तर काजूळवाडी प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. योग प्रात्यक्षिकांसाठी विशेष परीश्रम घेतल्याबद्दल श्री ब्रम्हानंद गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री चेतन चव्हाण नगराध्यक्ष दोडामार्ग, डॉ. संजय तांबे- नॅचरोपॅथी कन्सल्टंट, श्री नंदकिशोर म्हापसेकर मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय सोनावल, डॉ. सोपान जाधव प्रभारी प्राचार्य - लक्ष्मीबाई हळबे कॉलेज,ॐ नित्य दिव्य योगाश्रमचे अध्यक्ष श्री हेमंतकुमार गावणेकर, सचिव - श्री सागर नाईक, प्रकल्प प्रमुख - श्री आशिष भगत, श्री श्याम गोवेकर, श्री. सुरेश साळगावकर ,श्री गुरुनाथ नाईक, श्री मनोज नाईक, श्री. संजीव नाईक यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच बहुसंख्येने स्पर्धक, पालक व शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रास्ताविक हेमंतकुमार गावणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष गवस यांनी मानले. तसेच या स्पर्धेचे सुत्रसंचलन उत्कर्ष नाईक यांनी केले
स्पर्धेसाठी सासोली व झरेबांबर काजूळवाडी येथील महिलांनी भोजन व्यवस्थेसाठी सहकार्य केले.
दोडामार्ग तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
पहिला गट - ७ - ११ वर्षे (मुलगे)
विराज प्रसाद कुंभार - प्रथम, राजवीर लक्ष्मण पाटील - व्दितीय, रुद्र संतोष झोरे -तृतीय, यश किशोर वरक - उत्तेजनार्थ प्रथम, राहुल रुपेश झोरे - उत्तेजनार्थ व्दितीय
दुसरा गट ७ - ११ वर्षे (मुली)
शितल शंकर राठोड - प्रथम, मेहक संदेश धर्णे - व्दितीय, नम्रता तुकाराम गवस - तृतीय, समृद्धी देवीदास गवस - उतेजनार्थ प्रथम, लक्ष्मी देवेंद्र भैरवकर - उत्तेजनार्थ द्वितीय
तिसरा गट - १२ ते १६ (मुलगे)
दीपराज देवेंद्र भैरवकर - प्रथम, बाबुराव राजन झोरे - द्वितीय, विठोबा संतोष सुतार-तृतीय, रुद्र उमेश नाईक- उत्तेजनार्थ प्रथम, यश योगेश झोरे - उत्तेजनार्थ द्वितीय
चौथा गट - १२ ते १६ वर्षे (मुली)
धनश्री प्रेमानंद तळणकर - प्रथम, स्नेहल नारायण गवस - व्दितीय, समृद्धी परशुराम चौगुले - तृतीय, कृतिका रुपेश झोरे - उत्तेजनार्थ प्रथम, खुशी जयनाथ गौतम - उत्तेजनार्थ द्वितीय.
पाचवा गट - १७ ते १९ वर्षे (मुली)
भक्ती तुळशीदास गवस - प्रथम, सानिया अर्जुन गवस - द्वितीय, वेदिका प्रकाश नाईक - तृतीय, वैष्णवी शिवानंद प्रभावळकर - उत्तेजनार्थ प्रथम, अंजता लक्ष्मण सदुली - उत्तेजनार्थ द्वितीय