हत्ती प्रवण क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा : संतोषकुमार दळवी

Edited by: लवू परब
Published on: September 11, 2025 19:28 PM
views 101  views

दोडामार्ग : हत्ती प्रवण क्षेत्रात कार्यरत असलेले वनपाल, वनरक्षक व हाकारी हे बेजबाबदार व कामात हलगर्जीपणा करत असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत चौकशी करून आपल्या स्थरावर कारवाई  करण्याची मागणी घोटगे येथील संतोषकुमार दळवी यांनी लेखी निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. तसे पत्र देखील त्यांनी दिले आहे. 

दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, माझी शेती वायंगनतड येथे आहे. गेली तीन चार वर्ष गाव मौजे घोटगे पानशीचा डोंगर येथे बागायती मध्ये नारळाची झाडे, बांबूची बेटे, बागायतीच्या सभोवताली असलेले सौरऊर्जेचे कुंपण याचे जंगली हत्ती कडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालले आहे. मात्र, झालेल्या नुकसानीची वन कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले नाहीत.  किंबहुना कोणतीच दखल घेतली नाही. दिनांक ४ /९ /२०२५ च्या मध्यगत्री पुन्हा जंगली हत्तीने वांगनतड येथे मोठया प्रमाणात नुकसान कले आहे. हत्तीने केलेल्या नुकसानीच्या वेळी वन कमचारी हजार नव्हते .त्यांना त्या वेळचे हत्तींचे लोकेशन ही मिळाले नव्हते. हत्तींचा फिरण्याचा मार्ग सोडून वनविभागाचे कर्मचारी लोकेशन सोडून दोन किलोमिटग अंतरावर गस्त घालत होते. हाकारी व कर्मचारी याने नुकसान झालेल्या जागी गस्त घातली असती तर नुकसान झालेच नसते. दुसऱ्या दिवशी टुपारी १२ वाजेपर्यत हे वन कर्मचारी घालत नव्हते. हत्ती घोटगेवाडी गावात हद्दीत प्रवेश करताना ज्या मार्गाने येतात याची जाणीव झाली तरी वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत नाहीत. वनकर्मचारी कालव्याच्या कठड्यावर बसून टिंगल टवाळी करणे असले प्रकार चालू असतात. किंबहुना हाकारी व वनरक्षक घटनास्थली वेळत पोचत नाहीत. 

कृषी, महसुल व वनकर्मचारी याने पंचनामा समक्ष करून नुकसान भरपाई देण्याचे असताना कार्यरत वनसंरक्षक एकटेच आपल्या मर्जीप्रमाणे बेकायदेशीर पंचनामे करून भ्रष्टाचाराला खतपाणी धालीत आहेत. वनपाल वनविभागीय गस्तसाठी दिलेल्या यंत्रसामुग्री , वाहनाचा व मनुष्यबळाचा गैरवापर करीत आहेत. नागरीकांना हत्ती पासून त्रास होऊ नये यासाठी शेती बागायतीचे नुकसान होऊ नये म्हणून शासनामार्फत वनविभागाला पुरविलेली यंत्रमामुगी वाहंने इत्यादींचा गैरवापर होत आहे. गस्तीच्या वेळी मदत व्हावी म्हणुन मौक्याच्या टिकाणी वनविभागाच्या वतीने मंजूर झालेले सौरउर्जेवरील पथदिप बसविणे आवश्यक होते. परंतु,  वनअधिकारी यांच्या बेजवावदार पणामुले चुकीच्या जागेवर वमविण्यात आल . गत्रीच्या वेठी शेतकयांना शती वागायतीत फिरताना त्रास होवु नये म्हणुन वन विभागामार्फत देण्यान आलेल बॅटरी शेतकऱ्यांना पोचले नाहीत. जंगली हत्तीचे गुगल लोकेशन समजल्यास नागरिकांना सतर्क राहता येते. शेती बागायतीचे होणारे नुकसान टाळता यते. मात्र, ज्यांच्याकडे जबाबदारी देणेत आली आहे तेच बेजबाबदार वागत असतील तर कुंपणच शेत खात आहे. याबाबत गंभीर दखल घेत चौकशी करून कारवाई करावी.