
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हौद्स घालणाऱ्या वन्य हत्तींनी आपला मोर्चा घोटगे पंचक्रोशीत वळवला असून, येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सुरु केले आहे. रविवारी घोटगे येथील सतीश दळवी यांच्या काजू बागायती व नारळ, केळी उध्वस्त करून मोठे नुकसान केले आहे.
गणेश चतुर्थीत हत्तीनी घोटगे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. येथील शेतकऱ्यांच्या नारळ, केली, काजू, बांबू, सुपारी आदी बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. गणेश चतुर्थी कालावधीत हत्तीनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वनविभागाने करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.