
दोडामार्ग : गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्तांसाठी गणपती कॅलेंडरचे ग्रामपंचायत कार्याल घोटगेवाडी येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कार्यालय घोटगेवाडी येथे सोमवारी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रा. प.सदस्य श्री.विठ्ठल दळवी, किर्ती विद्यालय घोटगेवाडीचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक श्री.बाळकृष्ण मणेरीकर, माजी केंद्र प्रमुख श्री.सदाशिव पाटगांवकर, श्री.अशोक सांगुर्डेकर, पोलिस पाटील श्री.संतोष नाईक, शिक्षक श्री.अविनाश तिळवे, पाणलोट व्यवस्थापन समिती सचिव रुपेश देसाई, सत्यम सावंत, लाईनमन आबा कापडोस्कर आणि घोटगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे सरपंच श्री निवास शेटकर यांनी ग्रामपंचायत घोटगेवाडीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, उपस्थित मान्यवरांनी गणेश चतुर्थी निमित्त दरवर्षी होणाऱ्या या नवनवीन उपक्रमाचे कौतुक करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कॅलेंडरचे लोकार्पण करण्यात आले. उपसरपंच सागर कर्पे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून समस्त ग्रामवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिले.