
दोडामार्ग : झोळंबे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुखाजी सोमा गवस यांची फेरनिवड करण्यात आली. मागील १८ वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद सुखाजी गवस सांभाळत आहेत. यावेळी त्यांची फेर निवड झाल्या नंतर स्वागत करताना सरपंच विशाखा नाईक, गणेशप्रसाद गवस, उपसरपंच विनायक गाडगीळ, गणेशप्रसाद गवस, विनिता गवस सदस्य ग्रामपंचायत, संजना गवस, नामदेव परब ग्रामसेवक, राजेश गवस माजी सरपंच, पांडुरंग गवस माजी उपसरपंच, पोलीस पाटील संजय गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकरराव गवस, दिपक गवस, सुधीर गवस, प्रकाश गवस, शिवाजी जोशी, मदन गवस भरत गवस, देविदास जंगले, चित्रलेखा गवस, पूजा गवस, रंजना राऊळ अंगणवाडी सेविका, कुरुडे सिस्टर आरोग्य सेविका, डॉ.निकिता नाईक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.