'त्या' मायलेकींवर गुन्हे दाखल करा ; वरची धाटवाडी ग्रामस्थांची मागणी

आमरण उपोषणाचा इशारा
Edited by: लवू परब
Published on: August 11, 2025 14:39 PM
views 332  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील वरची धाटवाडी येथे लोकवर्गणीतून महसूल विभागाच्या ओहोळात बांधलेली पारंपारिक गणेश विसर्जनाची तळी जेसीबीच्या सहाय्याने माय - लेकींनी उध्वस्त केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर त्या मायलेकींनी सूडबुद्धीने तब्बल सतरा दिवसानंतर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. हे खोटे गुन्हे काढून टाकावेत व गणपती विसर्जन तळी उध्वस्त केलेल्या मायलेकींवर गुन्हे दाखल करावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केलीय. कार्यवाही न केल्यास स्वातंत्र्यदिनी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा वरची धाटवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.