
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत साटेली – भेडशीतील स्वामिनी प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा साटेली – भेडशी येथील यशवंत सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रजलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाने महिलांना नवीन उमेद देऊन आज महिलांना समूहाच्या माध्यमातून नवीन दिशा दिली. समूह ग्रामसंघ, प्रभागसंघ असा विस्तार होऊन महिलांचे सर्वतोपरी सबलीकरण करण्याचे कार्य उमेद अभियान करत आहे. याचाच एक भाग म्हणजे साटेली – भेडशीतील स्वामिनी प्रभागसंघ होय. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रभागसंघाच्या व्यवसाय वृद्धीच्या उपक्रमावर प्रकाशझोत टाकला आहे. साटेली – भेडशीतील प्रभाग संघाला 15 ग्रामसंघ जोडले असून प्रत्येक ग्रामसंघाने शासनाच्या योजना राबवून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. याचा सविस्तर आढावा प्रभाग संघाच्या लेखापरीक्षक श्रावणी दळवी यांनी सर्वांना करून दिला.
प्रभाग संघाची यशस्वी वाटचाल लक्षात घेऊन सिंधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत 16 सीटर फुल एसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स उपलब्ध झाली आहे. ही शासनाने दिलेली महिलांसाठी शाबासकीय आहे. शासनाने प्रभाग संघाच्या व्यवसाय वाढीसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ घेऊन प्रभाग संघाची व्यवसाय वृद्धी करण्याचे आव्हान यावेळी सर्व उपस्थित महिलांना करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान दोडामार्ग व्यवस्थापन कक्षासाठी भेडशील प्रभाग समन्वयक अपर्णा भंडारी, माटणे प्रभाग समन्वय अंकिता बांदेकर, मणेरी प्रभाग समन्वय कृष्णा जाधव, बँक ऑफ इंडिया साटेली – भेडशीचे शाखा व्यवस्थापक श्री. कुमार, दोडामार्ग पंचायत समिती स्वच्छता व पाणी विभागाचे अर्जुन गवस, स्वामिनी प्रभाग संघाच्या अध्यक्षा माया लोंढे, सचिव हर्षदा नाईक, कोषाध्यक्ष संपदा सुतार, सरपंचा छाया धर्णे, घोटगे सरपंच भक्ती दळवी, उपसरपंच लीना फर्नांडिस, ग्रामसंघ कोषाध्यक्ष नेहा ठाकूर, हेवाळे उपसरपंच वैशाली गवस, नारीशक्ती ग्रामसंघ अध्यक्ष जानकी सरवणकर, स्त्रीशक्ती ग्रामसंघ घोटगे सचिव दिव्या जाधव, यांसह माया लोंढे, प्रियंका पांगम, सुलोचना कुटुवळकर, प्रिया देसाई, मनीषा गवस, सुहानी गवस, रिया गवस, मनिशा दळवी, मयुरी पारधी, वैष्णवी टोपले आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी आपापल्या ग्रामसंघात उत्कृष्ट कार्य केलेल्या उत्कृष्ट ग्रामसंघ म्हणून जयभवानी ग्रामसंघ कोनाळ, प्रेरणा ग्रामसंघ खानयाळे, उत्कृष्ट समूह म्हणून नवचेतन ग्रामसंघ मोर्लेचागणेश समूह व स्त्रीशक्ती ग्रामसंघ घोटगेचा सावित्रीबाई फुले समूह, उत्कृष्ट उत्पादक गट म्हणून साटेली भेडशीचा अन्नपूर्णा उत्पादक गट, उत्कृष्ट लिपिका रूपाली गवस ( बोडडे ), उत्कृष्ट सीआरपी सायली मयेकर ( साटेली – भेडशी), व भाग्यश्री चारी (कोनाळ), उत्कृष्ट बँक सखी श्रद्धा मोरजकर, उत्कृष्ट लेखा परीक्षक श्रावणी दळवी आदी महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा आर्थिक वर्षातील लेखाजोखा लेखापरीक्षक श्रावणी दळवी यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक व आभार रूपाली गवस यांनी मानले.