
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात मागासवर्गीय मुला - मुलींसाठी शासकीय वसतीगृहाची इमारत राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वसतीगृह इमारत बांधकाम योजने अंतर्गन मंजूर करून मिळावी, अशी मागणी आमदार दिपक केसरकर यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय वसतीगृहाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये शिक्षण घेणाज्या मुला-मुलींची गैरसोय होत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी व नागरीकांकडून शासकीय वसतीगृह बांधून मिळण्यासाठी वारंवार मागणी होत आहे.
दोडामार्ग तालुक्यात राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या योजने अंतर्गत वसतीगृह मंजूर केल्यास त्यासाठी लागणारी आवश्यक जागा उपलब्ध होऊ शकते. या तालुक्यासाठी मागासर्गीय मुली व मुलांसाठी राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची वसतीगृह इमारत बांधकाम योजने अंतर्गत मंजूर करण्यात यावी व त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आमदार दिपक केसरकर यांनी केली आहे.